Salary Account : प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांच बँकेत सॅलरी अकाउंट असतं. किंबहुना कंपनी भागीदारी असणाऱ्या बँकेत कर्मचाऱ्यांचं वेतन खाते म्हणजेच सॅलरी अकाउंट (Salary Account) उघडतं. त्याच खात्यामध्ये कर्मचाऱ्यांचं संपूर्ण वेतन जमा होत असतं. पण तुम्हाला माहित आहे का की, सॅलरी अकाउंटमार्फत (Salary Account) बँकेकडून तुम्हाला सुविधा मिळतात? तसेच नोकरी सोडल्यावर त्या वेतन खात्याचं (Salary Account) पुढे काय होत? जाऊन घेऊयात..
Salary Account : सॅलरी अकाउंट कसं उघडलं जात?
सॅलरी अकाउंट (Salary Account) उघडण्यासाठी तुम्ही कॉर्पोरेटमध्ये कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या कंपनीचे त्या बँकेशी वेतन खाते संबंध असणे महत्वाचे आहे. तसेच कर्मचाऱ्याचे त्याच बँकेत या खात्याव्यतिरिक्त कोणतेही खाते नसावे.
Salary Account : …तर सर्वसाधारण खात्यामध्ये रूपांतर होते –
सॅलरी अकाऊंटला (Salary Account) लागू होणारे नियम इतर बचत खात्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. वेतन खात्यात किमान शिल्लक (Minimum Balance) ठेवण्याची आवश्यकता नाही. पण जर तुम्ही करत असेलेली नोकरी सोडली आणि तीन महिने पगार त्या सॅलरी अकाऊंटमध्ये जमा झाला नाही तर त्या सॅलरी अकाऊंटचे रुपांतर सर्वसाधारण खात्यात (General Account) केले जाते. त्यानंतर सामान्य बचत खात्याप्रमाणे (Saving Account) शुल्क आकारले जाते.
Salary Account : सॅलरी खातेधारकांनी लक्षात ठेवावे :
नोकरी किंवा खाते बदलल्यानंतर जर तुम्ही तुमचे पगार खाते बंद करत नसाल तर त्यात मिनिमम बॅलन्स ठेवा. तसे न केल्यास बँक त्या बचत खात्यावर मेंटेनन्स फी किंवा दंड आकारू शकते.
Salary Account : सॅलरी अकाऊंटमध्ये मिळणाऱ्या सुविधा :
जर तुमचं सॅलरी अकाऊंट असेल तर बँक तुम्हाला पर्सनलाइज्ड चेक बुक देते. तसेच ऑनलाईन बिल पेड करण्याची सुविधा किंवा इंटरनेटद्वारे पेमेंट सर्व्हिस देखील मिळते. बँका सेफ डिपॉझिट लॉकर, स्वीप-इन, सुपर सेव्हर सुविधा, मोफत चेकबुक आणि विनामूल्य ईमेल स्टेटमेंट यांसारख्या सुविधा खातेधारकाला मिळतात.