Stock Market : भारतीय माणसांची बुद्धिमत्ता सर्वत्र वाखाणली जाते. हुशार आणि गणिती प्रक्रिया वेगाने करण्याची बुद्धिमत्ता हा अनेकदा चर्चेचा विषय बनून राहिला आहे. बालवयापासून अनेक जण तल्लख असल्याची जाणीव होते. कॉलेज जीवनात मात्र ह्या अश्या तल्लख लोकांनी अभ्यास करण्यासोबतच शेअर मार्केटचा (Stock Market) पण अभ्यास करायला हवा. कारण हुशारी दाखवायची वेळ येते जेंव्हा पैसे गुंतवणूक (Investment) आणि शेअर मार्केट (Stock Market) संबधी काही गोष्टी असतात. गुंतवणुकीचा भूक नसणे किंवा कमी असणे हे कारण जास्त आढळते.
तरुणांनी स्टॉक मार्केट का शिकावे?
वयाने तरुण असणाऱ्या नोकरदारांना किंवा व्यावसायिकांना त्यांचे नियमित कर भरणे, शेअर मार्केट / इक्विटी मार्केट समजून घेणे किंवा शेअर ट्रेडिंगचा सराव करणे जरा अवघड वाटते. एक मानसिकता प्रचलित आहे ती म्हणजे स्टॉक मार्केट (Stock Market) मधील गुंतवणूक ही रिस्की आहे, जोखीम असलेली आहे, त्यातली गुंतवणूक कधीही बुडू शकते. बहुतांश भारतीय माणसे त्यांचे पैसे बँकेत ठेवी स्वरूपात ठेवतात. अंदाजे 10-15 टक्के लोकं स्टॉक (Stock) किंवा म्युच्युअल फंड्स (Mutual Funds) मध्ये पैसे गुंतवतात. स्टॉक पेक्षा सोने बरे म्युच्युअल फंड (Mutual Funds) पेक्षा रियल इस्टेट बरी असा अनेकांचा विचार असतो.
तरुणांनी शेअर मार्केटकडे सकारात्मकतेने पाहणं गरजेचं –
पण तरुण लोकांनी ह्या सगळ्याचा नीट विचार करून शेअर मार्केटकडे सकारात्मक पद्धतीने बघितले पाहिजे. शेअर मार्केट (Share Market) समजून घेऊन मूळ अभ्यासू वृत्ती कामाला लावून त्यातली गुंतवणूक वाढेल ह्यासाठी काम करायला हवे. गुंतवणूक संदर्भात सकारात्मक वातावरण तयार व्हायला हवे. आणि ते शिक्षणातून निर्माण झाल्यास त्याचा नक्की फायदा पुढील पिढीला होईल. ह्यासाठीच शैक्षणिक पातळीवर आणि पालकांनी आपल्या तरुण मुलांना गुंतवणूक आणि व्यवसाय ह्याबद्दल शिकवणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या वयाने तरुण अन बुद्धीने गतिमान असतात. काय करता येईल ह्यासाठी ह्याचा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे.
वाचकांसाठी काही मुद्दे विचारार्थ –
- मुलांना कॉलेजच्या सुरुवातीलाच बचत करणे आणि गुंतवणूक करणे ह्यातील फरक समजावून सांगूयात.
- गुंतवणूक करताना वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक असावी जेणेंकरून त्यातून नियमित उत्पन्न मिळू शकेल ह्याचे उदाहरणासहित स्पष्टीकरण मुलांना करून द्यावे.
- अगदी बेसिक बेसिक माहिती वेळीच स्पष्ट करून द्या. जसे की शेअर मार्केट म्हणजे काय? (What is Share Market?) NSE BSE म्हणजे काय? रिकरिंग डिपॉझिट, म्युच्युअल फंड, SIP ह्याची ओळख करून द्या.
वयाच्या ह्या टप्प्यावर अशी माहिती मिळाली आणि त्यात हुशारी निर्माण झाली तर भविष्यात मुले Finance Smart होतील आणि काळाच्या कसोटीवर आर्थिक दृष्ट्या उच्चपातळीवर जातील.