The Clothing Rental : शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. ह्या नवरात्रीच्या नऊ दिसांमध्ये आपण महिला उद्योजकांबद्दल (Entrepreneur) माहिती पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या अनोख्या संकल्पनेतून व्यवसाय यशस्वी उभा करून दाखवला.
महिला उद्योजक – शिल्पा भाटिया : Founder of The Clothing Rental (TCR)
द क्लोदिंग रेंटल (TCR) या स्टार्टअप व्यवसायाची (Startup Business) शिल्पा भाटिया यांनी 2005 मध्ये सुरुवात केली.
नावाप्रमाणेच या व्यवसायामार्फत लोकांना कपडे भाड्याने उपलब्ध करून देणे, ही यामागची मुख्य संकल्पना होती.
कपडे भाड्याने देणारी सेवा शिल्पा भाटिया TCR मार्फत पुरवतात.
जेंव्हा भाड्याने कपडे आणून समारंभास घालणे निषिद्ध मानले जायचे अश्या काळात हा व्यवसाय त्यांनी सुरु केला.
का सुरु केला The Clothing Rental (TCR) हा व्यवसाय?
शिल्पा भाटिया (Entrepreneur Shilpa Bhatia) एक स्टायलिस्ट म्हणून काम करायच्या. काम करताना त्यांना असे लक्षात आले की, मोठमोठ्या समारंभासाठी चांगले कपडे महाग मिळतात.
पण एका दिवसासाठी खरेदी करणे परवडत नाही. सामान्य कुटुंबियांसाठी ही तर एक मोठी बाजारपेठ असू शकते ह्याचा अंदाज शिल्पा भाटिया यांना आला.
आज पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही विविध कपडे भाड्याने TCR च्या वेबसाइटवरून भाड्याने घेऊ शकतात.
द क्लोथिंग रेंटल वाजवी दरात उत्तम सेवा प्रदान करत असल्याने हा व्यवसाय जास्त भरभराटीला आला आहे.
शिल्पाला असे वाटते की कपडे भाड्याने घेणे ग्राहकांना पैशांची बचत करण्यास आणि ट्रेंडमध्ये राहण्यास मदत करते.
क्लोदिंग रेंटल बिझनेसवर बोलताना शिल्पा सांगते की “विकत घ्यायला गेल्यास एक वधूचा लेहेंगा 1.5 लाखांपासून सुरू होऊ शकतो.
तसेच सौंदर्यदृष्ट्या आकर्षक डिझायनर लेहेंगा 10-15 लाखांपर्यंत जाऊ शकतो. त्या तुलनेत, भाड्याने घेतलेल्या लेहेंगांची किंमत साधारणपणे 5 हजार ते 30 हजाराच्या घरात जाते. –
खिसा हलका होत नाही आणि दरवेळी वेगवेगळे कपडे पण घालायला मिळतात हा फायदा ग्राहकांना होतो.
जर तुम्हालाही भाड्याने कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांच्या या https://theclothingrental.com/ वेबसाईटला भेट देऊ शकता.