Start-up Boom : भारतीय स्टार्टअप क्षेत्र जोरदार वाढत आहे. स्टार्टअपच्या वाढीस हातभार लावणारे अनेक घटक आहेत.
कोणते आहेत ‘हे’ घटक? –
शासन स्तरावरील पुढाकार :
भारत सरकारने स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया हे दोन उपक्रम त्यापैकीच. हे उपक्रम स्टार्टअप्सना विविध फायदे देतात, जसे की नोंदणीत सुलभता, कर सवलत, व्यवसाय वाढीसाठी निधी आणि विविध स्तरांवर मार्गदर्शन.
गुंतवणूकदार :
भारतीय स्टार्टअप्सना व्हेंचर कॅपिटल, वैयक्तिक गुंतवणूकदार आणि क्राउडफंडिंगसह अनेक फंडिंग पर्याय सध्याच्या काळात उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना सुद्धा भारतीय स्टार्टअपने आकर्षित केले आहे.
हेही वाचा : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीपूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? समजून घ्या..
कुशल कर्मचारी :
भारतात विशेषत: अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील प्रतिभावान आणि कुशल माणसांचा मोठा समूह आहे. ह्यामुळे स्टार्टअप्सना विविध कौशल्य असलेल्या टीम्स तयार करण्यात मदत झाली आहे. स्टार्टअप्सच्या वाढीसाठी आणि यशासाठी ह्या सर्वात आवश्यक बाबी आहेत.
इनोव्हेशन :
भारतीय स्टार्टअप्स त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि जीवनावश्यक उपायांसाठी प्रसिद्ध झाले आहेत. बाजारपेठेतील गरज ओळखण्यात आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अद्वितीय उत्पादने आणि सेवा विकसित करण्यात भारतीय स्टार्टअप सक्षम बनले आहेत.
स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वाढता प्रवेश :
भारतात स्मार्टफोन आणि फास्टेस्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या वाढीमुळे डिजिटल सेवा पुरवणारे आणि उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. यामुळे स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणावर युझर्सपर्यंत पोहोचता आले आहे. आणि व्यवसाय वाढायला मदत होते आहे.
सपोर्टिव्ह स्टार्टअप इकोसिस्टम :
भारतीय स्टार्टअप्सना सपोर्टिव्ह अशी इकोसिस्टममध्ये सध्या तयार झाली आहे. ह्यात इनक्यूबेटर, एक्सीलरेटर्स आणि को-वर्किंग स्पेसचा समावेश आहे. ह्या गोष्टी स्टार्टअप्सना मार्गदर्शन, नेटवर्किंग संधी आणि बाकी सपोर्टिव्ह गोष्टी प्रदान करतात. अश्या गोष्टींनी स्टार्टअप्सना वाढण्यास आणि यशस्वी होण्यास मदत होते.
एकूणच, या सगळ्या घटकांनी भारतीय स्टार्टअपच्या वाढीस हातभार लावला आहे. ज्यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे.