Senior Citizen Savings Scheme : म्हातारपणी मुलांवर कोणत्याही बाबतीत अवलंबून राहायला नको, ही आजकालच्या सगळ्याच पालकांची इच्छा असते.
आयुष्यभर राब राब राबून जमवलेली पुंजी उत्तर आयुष्यात वाढेल कशी आणि कधी पैसे लागले तर काय करायचे हा नेहमीच प्रश्न जेष्ठ नागरिकांना पडत असतो.
भारत सरकारची एक अशी योजना आहे जी जेष्ठ नागरिकांना रिटायरमेंट बेनेफिट्स (Retirement Benefits) देते आणि कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवते.
Senior Citizen Savings Scheme : जेष्ठ नागरिक बचत योजना –
भारतात वास्तव्य करणारे आणि भारतीय नागरिकत्व असणारी व्यक्ती सदरील केंद्र सरकारच्या SCSS स्कीममध्ये पैसे गुंतवू शकते.
हेही वाचा : Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजना नेमकी काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.
पैसे एकरकमी एकट्याच्या नावे किंवा जोडीच्या नावे पैसे गुंतवण्याची तरतूद ह्या SCSS स्कीम मध्ये आहे.
ह्या स्कीम मध्ये गुंतवलेली रक्कम ही फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त परतावा देणारी असल्याने अनेक जेष्ठ नागरिक ह्या शासन पुरस्कृत स्कीम मध्ये पैसे गुंतवत आहेत.
बजेटमध्ये निर्णयाची घोषणा –
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांनी सादर केलेल्या बजेटनुसार (Budget 2023) सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये एकरकमी पैसे गुंतवण्याची मर्यादा 15 लाखांवरून 30 लाख करण्यात आलेली आहे.
ह्या गुंतवणुकीवर साधारण दसादशे 8% इतक्या दराने व्याज मिळेल. सदरील गुंतवणूक करप्राप्त (Taxable) आहे.
रुपये 50 हजारापेक्षा जास्त जर व्याज एका आर्थिक वर्षात मिळणार असेल तर टॅक्स एट सोर्स (Tax at source) कापला जाईल.
SCSS ही एक सुरक्षित मात्र दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजेच Long Term Investment आहे.