FinNews : सध्या भारतामध्ये डिजिटली पैश्यांचे व्यवहार (Digital Money Transactions) जास्त प्रमाणात होत आहेत. खिशात पैसे न ठेवता Bank to Bank पैसे पाठ्वण्यावर भारतीयांचा जास्त जोर आहे तरीही नाणी (Coins) भारतीय चलनाचा (Indian Currency) मोठा भाग आहे. अनेक लहान मोठ्या व्यवहारांसाठी आजही नाण्यांचा चांगल्या प्रमाणात वापर होत आहे. पण कधी कधी व्यावसायिकांकडे नाण्यांचा अतिरिक्त साठा बनत जातो. त्यामुळे हे चलन वापरात कसं आणायचं किंवा आपली बँक किती रकमेची नाणी जमा करू शकते याबाबत व्यापाऱ्यांमध्ये साशंकता असते. तर नाण्यांबाबत रिझर्व्ह बँकेचे काय नियम आहेत? जाणून घेऊयात.
बँक खात्यात किती रुपयांची नाणी जमा करता येतात?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) माहितीनुसार सध्या आपल्या देशात बँकांमध्ये नाणी जमा करण्याची कोणतीही निश्चित मर्यादा नाही. तसेच बँक त्यांच्या ग्राहकांकडून कितीही रकमेची नाणी घेण्यास स्वतंत्र आहेत. त्यामुळे तुम्ही बँकेत कितीही नाणी जमा करू शकतात याला कुठलीही मर्यादा नाही.
नाणी हे कायदेशीर चलन –
नाणी हे कायदेशीर चलन आहे त्यामुळे लोकांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कुठलाही संकोच न बाळगता नाण्यांचा चलन म्हणून स्वीकार केला पाहिजे असं रिझव्र्ह बँकेने म्हटलं आहे. तसेच नाणी चलनातून बाद झाली आहेत किंवा ही नाणी चालत नाहीत असं कोणी सांगितल्यास विश्वास ठेवू नका. नाणी चलनातून बाद करण्याचा किंवा नाणी चलनातून बाद झाली आहेत किंवा ती अवैध्य आहेत असं बोलण्याचाही अधिकार लोकांना नाही. असं भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, देशात सध्या 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत. तसेच भारतातील नाणी निर्मिती कायदा 2011 अंतर्गत, देशात एक हजार रुपयांपर्यंतची नाणी रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) जारी करू शकते.