FinGnyan : सध्या आपल्याकडे लग्नसराईचा सिझन सुरु आहे त्यामुळे सोने खरेदी जोरात चालू आहे. त्याचा परिणाम बाजारातील सोन्याच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे आपण विकत घेतलेलं सोन हे नेमकं किती कॅरेटच आहे? सराफाने आपल्याला कॅरेट प्रमाणे योग्य किमतीत सोन दिल आहे का हे समजून घेणं पण आवश्यक आहे.
सोन्याची शुद्धता ही कॅरेटमध्ये मोजली जाते त्यानुसार सोन्याची किंमत ठरवली जाते. सोन्याची शुद्धता 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट, 18 कॅरेट, 16 कॅरेट, 14 कॅरेट, 9 कॅरेट या मापकांद्वारे ओळखली जाते. तुम्ही घेतलेलं किती कॅरेटचं हे तुम्हाला त्यावरील अंकांवरून समजेल.
24 कॅरेट – 999 असं लिहिलेलं सोन म्हणजे 24 कॅरेट सोन. 24 कॅरेट सोन हे सर्वात शुद्ध सोन म्हणून ओळखलं जात.
23 कॅरेट – 958 असं लिहिलेलं सोन म्हणजे 23 कॅरेट सोन.
22 कॅरेट – 916 असं लिहिलेलं सोन म्हणजे 22 कॅरेट सोन. बरेच दागिने 22 कॅरेट सोन्यामध्ये तयार होतात.
21 कॅरेट – 875 असं लिहिलेलं सोन म्हणजे 21 कॅरेट सोन.
20 कॅरेट – 833 असं लिहिलेलं सोन म्हणजे 20 कॅरेट सोन.
18 कॅरेट – 750 असं लिहिलेलं सोन म्हणजे 18 कॅरेट सोन. KDM दागिन्यांसाठी याचा उपयोग होतो.
16 कॅरेट – 666 असं लिहिलेलं सोन म्हणजे 16 कॅरेट सोन.
14 कॅरेट – 585 असं लिहिलेलं सोन म्हणजे 14 कॅरेट सोन.
09 कॅरेट – 375 असं लिहिलेलं सोन म्हणजे 09 कॅरेट सोन.