Function Of Banks : सर्वसामान्य माणसाला बँकिंग समजणे आजच्या युगात आवश्यक झालेले आहे. चलनात तर आताशा डिजिटल रुपया आलेला आहे. मागील लेखात आपण बँकांचे 3 प्रकार पाहिले. आता आपण उरलेले 5 प्रकार पाहणार आहोत. (बँका नेमकं काय काम करतात? भाग 3)
Function Of Banks : बँका नेमकं काय काम करतात?
4) व्यावसायिक बँक किंवा कमर्शिअल बँक (Commercial Banks)
ह्यामध्ये परत काही उपप्रकार आहेत. ह्यामध्ये येणाऱ्या सर्व बँक्स ह्या 1956च्या बँकिंग कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या आहेत. नफा ह्या मुख्य उद्देशाने काम करत असलेल्या ह्या बँकांची रचना ही एकसंध असून त्यांची मालकी केंद्र सरकार,राज्य सरकार संथात्मक मालकी अशी असते. ग्रामीण ते शहरी सर्वच क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. सर्व बँकांचे कामकाज हे रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) नियमावलीनुसार चालते. त्यांना रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) आदेशानेच व्याजदर कमी अथवा जास्त आकारणी करता येते. तीन उपप्रकारांमध्ये कमर्शिअल बँक प्रकार विभागला गेला आहे.
Panjabi Breakfast : …ओ पाजी परांठा, लस्सी हो जाये !! पंजाबमधील काही लोकप्रिय नाश्त्याचे 7 प्रकार.
A) पब्लिक सेक्टर बँक (Public Sector Banks) सावर्जनिक क्षेत्रातल्या बँक –
ज्यांना आपण सरसकटपणे सरकारी बँक म्हणजे नॅशनलाईज बँक असे म्हणतो त्या बँका ह्या उपप्रकारात मोडतात. ह्यांची मालकी केंद्र सरकारकडे असते. उदा. SBI, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया इ.
B) प्रायव्हेट सेक्टर बँक (Private Sector Banks) खाजगी क्षेत्रातल्या बँक –
ज्यांची मालकी उद्योगसमूह किंवा कम्पनी म्हणून असते त्यात ह्या उपप्रकारातल्या बँक मोडतात. उदा. HDFC Bank, ICICI Bank, IndusInd Bank, Kotak Mahindra Bank, Yes Bank
C) फॉरीन बँक (Foreign Banks) विदेशी बँक –
मूळ बँक परदेशातील असेल, म्हणजे ज्या बँकेची स्थापना दुसऱ्या देशातील असेल आणि त्यांच्या ब्रॅंचेस व्यवसाय विस्तार म्हणून भारतात असतील तर त्या ह्या उपप्रकारात येतात. उदा. HSBC, CITI Bank, Deutsche Bank, DBS Bank Ltd.
5) लोकल एरिया बँक (Local Area Banks) –
1996 साली लोकल एरिया बँक स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाली. तर 1999 साली पहिली बँक नोंदणीकृत झाली. ह्या क्षेत्रातल्या बँक 1996च्या कंपनी कायद्याखाली नोंदणीकृत असतात. सध्या दक्षिण भारतात अश्या 4 बँक स्थापित आहेत. उदा. – Coastal Local Area Bank Ltd, Krishna Bhima Samruddhi Local Area Bank Ltd., Capital Local Area Bank Ltd., Subhadra Local Area Bank Ltd.
6) स्पेशलाइज्ड बॅंक्स (Specialized banks) –
विशिष्ट हेतूने किंवा एखाद्या विशिष्ट यंत्रणेच्या सोयीसाठी सरकारने स्थापन केलेल्या बँक ह्या कॅटेगरीत मोडतात. देशांतर्गत एखाद यंत्रणा चालविण्यासाठी, तसेच विकासाच्या हेतूने ह्या प्रकारातल्या बँक स्थापन करण्यात आलेल्या आहेत. उदा. – सिडबी, EXIM बँक, नाबार्ड
7) स्मॉल फायनान्स बँक (Small Finance banks) –
नावाप्रमाणेच या प्रकारात मोडणाऱ्या बँक लघु म्हणजे सूक्ष्म उद्योग, छोटे शेतकरी आणि समाजातील असंघटित क्षेत्र यांना कर्ज आणि आर्थिक सहाय्य देते. या बँका देशाच्या मध्यवर्ती बँकेद्वारे म्हणजे RBI द्वारे नियंत्रित केल्या जातात. उदा.- AU Small Finance Bank, Ujjivan Small Finance Bank, Jana Small Finance Bank
8) पेमेंट्स बँक (Payments Banks) –
आधुनिक भारताचा नवा पेमेंट गेटवे म्हणवल्या जाणाऱ्या पेमेंट्स बँक. बँकिंगचा हा एक नवीन प्रकार म्हणता येईल. पेमेंट बँक ही भारतीय रिझर्व्ह बँकेची संकल्पना आहे. पेमेंट बँकेत खाते असलेली व्यक्ती फक्त रु. 1 लाख पर्यंत रक्कम जमा करू शकते. सदरील खाते पैसे स्वीकार किंवा देणे ह्यासाठीच कार्यरत असते. उदा. – Airtel Payments Bank, India Post Payments Bank, Paytm Payments Bank