Fixed Deposit Interest Rate : सध्याच्या युगात आर्थिक दृष्ट्या सक्षम असणं फार महत्वाचं आहे. तसेच वर्तमानात केलेली गुंतवणूक भविष्यात केव्हाही फायदेशीर ठरू शकते.
म्हणूनच खर्चापेक्षा गुंवणूकीला जास्त महत्व दिले पाहिजे. गुंतवणूक करायची म्हणजे सर्वप्रथम सुरक्षित गुंवणूकीला जास्त प्राधान्य दिले पाहिजे.
भारतातील सर्वच छोट्या-मोठ्या बँका तसेच वित्तीय संस्था सुरक्षित गुंतवणुकीसह परताव्याची हमी देण्यासाठी मुदत ठेव योजना चालवतात.
सध्या रिझर्व्ह बँक आपल्या रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ करत आहे. त्यामुळे जवळपास बँका तसेच वित्तीय संस्थांनी मुदत ठेवींवरील व्याजाचे दार वाढवले आहेत.
यामुळे ग्राहकांना सुरक्षित गुंतवणूक करून जास्तीचा नफा मिळवण्याची नामी संधी आहे.
Fixed Deposit Interest Rate : “या” वित्तीय संस्था देत आहेत सर्वाधिक व्याजदर –
युनिटी बँक (Unity Bank) :
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या मुदत ठेव योजनावरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यानुसार हा व्याजदर 7.35 टक्क्यांपासून ते 8.50 टक्क्यांपर्यंत असणार आहे.
हेही वाचा : अकौंटिंग मध्ये नेमकं काय करियर घडू शकते? जाणून घ्या.
Fixed Deposit Interest Rate : उज्जीवन बँक
उज्जीवन बँकेने सर्व एफडी योजनांवर 5 नोव्हेंबरपासून वाढीव व्याजदर लागू केले आहेत. बँकेने सर्व योजनांवर ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अधिक व्याज देऊ केले आहे.
बँक हा उच्चांक देत आहे. त्यानुसार बँक 6.50 टक्क्यांपासून ते 8.00 टक्क्यांपर्यंत एफडी योजनांवर व्याजदर देत आहे.
ESOF स्मॉल फायनान्स बँक :
ESOF फायनान्स बँकेने 1 नोव्हेंबर रोजी जवळपास सर्व प्रकारच्या FD योजनांवर व्याजदरात वाढ केली आहे.
त्यानुसार नागरिकांना FD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 4.50 ते 8.50 टक्के व्याज दिले जात आहे.
Fixed Deposit Interest Rate : फिनकेअर बँक
फिनकेअर बँकेने 9 नोव्हेंबर रोजी जवळजवळ सर्वच मुदत ठेव योजनानावरचे व्याजदर वाढवले आहे.
यासोबतच फिनकेअर बँकेने सर्व प्रकारच्या गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे.
त्यानुसार बँक 6.75 टक्क्यांपासून ते 8.00 टक्क्यांपर्यंत एफडी योजनांवर व्याजदर देत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक :
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने ज्येष्ठ नागरिकांना सर्व योजनांवर 0.75 टक्के अधिक व्याज देऊ केले आहे. यासोबत बँक 8.00 टक्क्यांपर्यंत ठेवींवर व्याज देत आहे.