Fixed Deposit : मुदतठेव योजना (Fixed Deposit) भारतीय लोकांमध्ये जरा जास्तच लोकप्रिय आहे. ट्रॅडिशनल सेव्हिंगची मानसिकता असणारी माणसे फिक्स्ड डिपॉझिटलाच (Fixed Deposit) प्राधान्य देतात असे दिसून आले आहे. ह्याची अनेक कारणे आहेत. ह्या मागच्या महत्वाच्या कारणांचा शोध घेतला असता असे दिसून येते की फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) करणे सोपे, सुटसुटीत आणि त्याच्या सुरक्षेची हमी गुंतवणूकदारांना वाटते. मार्केटच्या अस्थिरतेपासून आपले कष्टाने कमावलेले पैसे कसे सुरक्षित राहतील ह्याची अनेकांना काळजी वाटते.
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूकदारांचा जास्त कल का?
इमर्जन्सीच्यावेळी लागणारी रक्कम तातडीने काढता आली पाहिजे आणि त्यासाठी फार धावपळ किंवा कागदपत्रे गोळा करायची गरज पडणार नाही अशी सोपी यंत्रणा फक्त FD देते असा विश्वास असल्याने सर्वच गुंतवणूकदार याचा विचार करतात.
महागाईवर मात करण्यासाठी आरबीआयने (RBI) रेपो दरात (Repo Rate) वाढ केली. FD सुरक्षित आणि निश्चित अटींवर खात्रीशीर गुंतवणूक देतात. म्हणून सुरक्षितता आणि हमीभावाची भावना अनेक गुंतवणूकदारांना FD’कडे आकर्षित करते. ज्यांना Low Risk म्हणजे कमी जोखमीची गुंतवणूक हवी असते ते FD कडे आकर्षित होतात.
म्युचअल फंडपेक्षा FD भारी…
2017 मध्ये, SEBI ने गुंतवणूकदारांची इन्व्हेस्टमेंटसाठीची मानसिकता समजून घेण्यासाठी एक सर्व्हे केला. त्यात असे लक्षात आले की 85-90% पेक्षा जास्त गुंतवणूकदार त्यांचा निधी मुदत ठेवींमध्ये ठेवण्यास उत्सुक असतात. केवळ 10 टक्के गुंतवणूकदार म्युचअल फंडात (Mutual Funds) गुंतवणूक करण्यात इच्छुक असतात.
इतर गुंतवणूक किचकट..
शेअर मार्केटमधल्या घडामोडी समजून घेण्यास किचकट असतात असेही अनेकांना वाटते. तसेच इन्शुरन्स (Insurance) वगैरे गुंतवणूक ह्या लांब पल्ल्याच्या म्हणजेच दीर्घ स्वरूपातल्या असल्याने जमवलेले पैसे पटकन गुंतवणे FD मध्ये सोयीस्कर वाटते. सोन्यातली गुंतवणूक पण अनेकदा रिस्की वाटते असेही काही लोकांनी सांगितले. थोडी थोडी जमवलेली पुंजी फिक्सड डिपॉझिट (FD) मध्येच सोयीची वाटते असे एका मध्यमवर्गीय गृहिणीचे म्हणणे आले.