Entrepreneurs : गूगलनंतर युट्यूब हा बऱ्याच जणांचा गुरु बनला आहे. कोरोनामध्ये सर्वजण घरीच होते. त्यामुळे काहीजण घरामधूनचं काहींना काही शिकण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या शिकण्याचा सर्वात मोठा आधार म्हणजे युट्यूब. याच काळात युट्यूबवर व्हिडीओ पाहून गृहिणींचा केक बनविण्याचा बिझनेस चांगलाच फुलला. तसेच अनेकांनी युट्यूबच्या माध्यमातून काहीतरी वेगळं शिकण्याला प्राधान्य दिलं. तर काहींनी गरीब विद्यार्थ्यांसाठी युट्यूबवर शिकवणीचे क्लासेस सुरु केले, एवढाच नाही तर काहींनी घरगुती जेवणाचे, काही नाट्यमय व्हिडीओ बनवले युट्युबवर अपलोड करून लाखो रुपये कमवले. आता ही झाली कोरोना काळातील गाथा, पण 2010 मध्ये अशाच प्रकारे एका मोठ्या कंपनीचा पाया घातला गेला. या कंपनीची सुरुवात युट्युबवर शिकवणीचे व्हिडीओ टाकण्यापासून झाली आणि आता याच कंपनीचं नेटवर्थ गेल्यावर्षी म्हणजे 2022 मध्ये तब्बल 3.4 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 25 हजार करोड रुपये इतकं होत.
कोणती आहे ही कंपनी?
काहीही करण्याची जिद्द असली की माणूस शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो. तसंच गौरव मुंजल (Gaurav Munjal) यांनी केलं आहे. आता हा गौरव मुंजल कोण???? अरे हो हो थोडं थांबा…सगळं सांगतो. गौरव मुंजल हे एका अशा मोठ्या कंपनीचे सीईओ आहे ज्या कंपनीची सुरुवात त्यांनी व्हिडिओ तयार करुन युट्यूब चॅनलवर उपलोड करून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर गौरव मुंजल यांना एक आयडिया सूचली. त्या आयडियावर मेहनत घेतली. पाहता पाहता आता ही कंपनी भारतातील नाही तर जगभरातील सर्वात मोठ्या ई-टेक कंपन्यांपैकी एक मोठी कंपनी बनली आहे.
हो..हो कंपनीचं नाव देखील सांगतो… ही कंपनी आहे अनअकॅडमीचं (Unacademy). आता अनअकॅडमीचं नाव सर्वानीचं ऐकलं असणार आहे. गौरव मुंजल हे अनअकॅडमी (Unacademy) या कंपनीचे सीईओ आहेत. 2010 मध्ये युट्यूब चॅनल ते 25 हजार करोड रुपये कंपनीचा नेटवर्थ असा प्रवास त्यांनी केलाय.
सुरुवात कशी?
गौरव मुंजलने यांनी त्याच्या आणखी दोन मित्रांना म्हणजे हिमेश सिंह आणि आयएएस अधिकारी रोमन सैनी सोबत घेऊन एक युट्यूब चॅनल सुरु केले. त्यानंतर शैक्षणिक प्लॅटफॉर्म तयार केला. गौरवने त्यावेळी कम्प्युटर ग्राफिक्स तयार करून व्हिडीओ बनवले. त्यामुळे त्यांच्या चॅनेलला खूप लोकप्रियता मिळाली. चॅनेलचे 24 हजार सब्सक्राईबर्स 2015 मध्ये आयएएस अधिकारी डॉ. रोमन सैनी यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ युट्यूब चॅनलवर लक्ष केंद्रीत केलं. त्यानंतर 10 डिसेंबर 2015 रोजी दोघांनी मिळून स्वतःची कंपनी स्थापन केली. दिवस रात्र काम करून निधी जमवला. अनअकॅडमीचे (Unacademy) सध्या 50 दशलक्ष सब्सक्राईबर्स आहेत. तसेच अनअकॅडमी (Unacademy) ही कंपनी बायजू (Byju’s) नंतर भारतातील सर्वात मोठी ई-टेक कंपनी आहे.
गौरव मुंजल सध्या अनअकॅडमी (Unacademy) कंपनीचे सीईओ (CEO) आहेत. तसेच त्यांना 1.58 कोटी रुपये इतका पगार आहे. तर Sequoia Capital India, नॅक्सस व्हेंचर्स, SAIF पार्टनर्स आणि Blume व्हेंचर्स अनअकॅडमी (Unacademy) कंपनीचे गुंतवणूकदार आहेत.