Customer Survey : विमा क्षेत्र आजच्या काळात लक्षणीय प्रमाणात वाढलेले आहे. कारण अधिकाधिक लोकांना स्वतःचे, कुटुंबाचे, मालमत्तेचे संरक्षण करण्याचे महत्त्व समजले आहे. येणार काळ हा नेमकं काय घेऊन येईल हे अनाकलनीय असल्याने आणि अनिश्चित वातावरण वाढत असल्याने विमा ही गोष्ट लक्झरी न राहता अत्यावश्यक गरज बनली आहे. विमा क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे, नवनवीन कंपन्या बाजारात प्रवेश करत आहेत आणि विद्यमान कंपन्या त्यांच्या असलेल्या ऑफरचा विस्तार करत आहेत. ग्राहक देवो भाव ही संस्कृती असलेल्या देशात इंशुरन्स ग्राहक हा खरोखर महत्वाचा भाग असतो.

ह्या सगळ्या घडामोडींमुळे विमा क्षेत्रात सध्या ग्राहक सर्वेक्षण महत्त्वाचे बनले आहे. कारण ते ग्राहकांच्या गरजा, प्राधान्ये आणि समाधानाच्या पातळीबद्दल मौल्यवान अशी माहिती पुरवतात.
हेही : खासगी कंपनीतून सॅलरी घेणाऱ्या प्रत्येकाला ‘हे’ पाच नियम माहित असायला हवे!
विमा क्षेत्रात ग्राहक सर्वेक्षण महत्त्वाचे ‘का’ आहेत याची काही विशिष्ट कारणे :
ग्राहकांच्या गरजा समजून घेणे :
ग्राहक सर्वेक्षण केल्याने विमा कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्ये समजून घेण्यास मदत होते. विमा उत्पादने, विम्यासंदर्भातील सेवा आणि ग्राहक सेवा ह्या बाबत ग्राहकांचे अभिप्राय गोळा करून कंपन्या ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात.
ग्राहकांचे समाधान मोजणे :
विमा कंपन्यांना ग्राहकांच्या समाधानाची पातळी मोजण्यासाठी ग्राहक सर्वेक्षण जास्त आवश्यक ठरते. विम्याचे दावे प्रक्रिया आणि ग्राहक सेवा यांसारख्या विशिष्ट पण कामकाजाच्या दृष्टीने महत्व असलेल्या गोष्टी चकटन सुधारण्यासाठी ग्राहक समाधान मोजणे जास्त फायद्याचे ठरते.
अधिक ग्राहक मिळवण्यासाठी :
नियमित ग्राहक सर्वेक्षण केल्याने विमा कंपन्यांना विक्री वाढीसाठी नवीन संधी प्राप्त होऊ शकते. ग्राहकांच्या अभिप्रायांचे विश्लेषण करून, विमा कंपन्या त्यांच्या उत्पादन विषयक ऑफर्सचा विस्तार करू शकतात किंवा ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी त्यांच्या सेवा सुधारू शकतात.
कस्टमर सर्व्हिस सुधारणे :
ग्राहकांचे म्हणणे नीट ऐकून आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करून, विमा कंपन्या ग्राहक समाधान वाढवू शकतात. ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या आणि त्यांना योग्य ते पर्याय सुचवणाऱ्या कंपन्यांशी ग्राहक जास्त जोडले जातात. ज्याचा फायदा कम्पनीचा महसूल आणि नफा वाढवण्यात होतो.
एकंदरीतच, (Customer Survey) कस्टमर सर्व्हे म्हणजे ग्राहक सर्वेक्षण हे विमा कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्ये समजून घेण्यात, समाधानाची पातळी मोजण्यासाठी, वाढीच्या संधी ओळखण्यात मदत करून विमा क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.