Card less Cash Withdrawal : बदलत्या काळानुसार बँकाही ऍडव्हान्स झाल्या आहेत. बँकांनीही नवी टेक्नॉलॉजी स्वीकारली आहे. ग्राहकांच्या सुलभतेसाठी बँका नव्या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करत आहेत. आता असाच एक बदल बँकिंग क्षेत्रात घडून आला आहे. आधी बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड असणं आवश्यक होत आता त्याची काहीही आवश्यकता नाहीये कारण डेबिट कार्ड किंवा एटीएम कार्ड नसलं तरीही तुम्हाला UPI ID च्या साह्याने बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहे. त्यामुळे घरातून निघताना गडबडीत तुमचं एटीएम कार्ड घरीच विसरलं तरीही तुमची धावपळ होणार नाही. काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांच्या सुलभतेसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त UPI ID’च्या साह्याने एटीएम मशिनमधून पैसे काढू शकता. तर UPI ID’च्या मदतीने एटीएम मशिनमधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.
एटीएम मशिनमधून UPI ID’द्वारा असे काढा पैसे
- UPI द्वारे पैसे काढण्यासाठी सर्वतप्रथम तुम्हाला एटीएम मशीनमध्ये विनंती तपशील भरावा लागेल.
- यानंतर तिथे एक एक QR कोड तयार होईल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे UPI अॅप उघडून आणि तो QR कोड स्कॅन करावा लागेल.
- या स्कॅनिंगनंतर, तुमची विनंती मंजूर केली जाईल.
- यानंतर, रक्कम भरल्यानंतर, तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकाल.