Wednesday , 20 November 2024
Home WorldFinNews Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बँका असणार बंद
WorldFinNews

Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बँका असणार बंद

Bank Holidays In October 2023
Bank Holidays In October 2023

Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात बँकांची कोणतेही कामे असतील तर बँकांना कधी सुट्टी आहे? याची खात्री करून घराच्या बाहेर पडा. कारण ऑक्टोबर महिन्यात देशातील बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक पाहूनच बँकांची कामे करायला घराच्या बाहेर पडा. म्हणजेच तुमचा वेळही वाचेल आणि धावपळ देखील होणार नाही.

Bank Holidays In October 2023 : या महिन्यात 15 दिवस बँकांना सुट्टी

भारताची मध्यवर्ती बँक ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या’ (RBI) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या ऑक्टोबर महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्टी असणार आहे. रविवार, महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार, सण उत्सव, महात्मा गांधी जयंती असे मिळून बँकांना 15 दिवस सुट्टी असणार आहे.

हेही वाचा : RBI Assistant Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत भरती सुरु, Apply Here

Bank Holidays In October 2023 : कोणकोणत्या दिवशी बँका असणार बंद

या महिन्याच्या पहिल्याच तारखेला बँकेला सुट्टी असणार आहे. कारण महिन्याची सुरुवातीलाच रविवार आल्याने बँकेला सुट्टी असणार आहे. तसेच 2 तारखेला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीलाच बँकांना सलग सुट्ट्या असणार आहे. तर जाणून घ्या ऑक्टोबर 2023 महिन्यातील भारतातील बँकांच्या सुट्यांचे वेळापत्रक…

ऑक्टोबरमध्ये ‘या’ दिवशी बंद राहणार बंद

  • 1 ऑक्टोबर 2023 – रविवार
  • 2 ऑक्टोबर 2023 – गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
  • 8 ऑक्टोबर 2023 – रविवार
  • 14 ऑक्टोबर 2023 – दुसऱ्या शनिवारी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
  • 15 ऑक्टोबर 2023 – रविवार
  • 18 ऑक्टोबर 2023 – गुवाहाटीमध्ये काटी बिहू या सणामुळं बँका बंद राहणार.
  • 21 ऑक्टोबर 2023 – दुर्गापूजा/महा सप्तमीनिमित्त आगरतळा, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता येथील बँकांना सुट्टी असेल.
  • 22 ऑक्टोबर 2023 – रविवार
  • 24 ऑक्टोबर 2023 – दसऱ्यामुळं हैदराबाद आणि इंफाळ वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
  • 25 ऑक्टोबर 2023 – गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे (दसई) बँका बंद राहतील.
  • 26 ऑक्टोबर 2023 – गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये दुर्गा पूजा (दसाई)/अॅक्सेशन डे बँका बंद राहतील.
  • 27 ऑक्टोबर 2023 – गंगटोकमध्ये दुर्गापूजेला (दसई) बँका बंद राहतील.
  • 28 ऑक्टोबर 2023 – कोलकात्यासह संपूर्ण देशात लक्ष्मीपूजन आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.
  • 29 ऑक्टोबर 2023 – रविवार
  • 31 ऑक्टोबर 2023 – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहमदाबादमधील बँकांना सुट्टी असेल.

या सुट्ट्यांमध्ये देखील तुम्ही तुमच्या बँकेच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊ शकता.

Related Articles

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Important decisions of Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन ह्यांचे लोकप्रिय निर्णय.

Important decisions of Nirmala Sitharaman : 2019 सालापासून निर्मला सीतारामन ह्या भारताच्या...