Wednesday , 20 November 2024
Home WorldFinNews Ayushman Bharat Scheme Scam : कॅगचा धक्कादायक खुलासा..! ‘या’ योजनेत एकाच मोबाईल नंबरवरून झाली 7.5 लाख लोकांची नोंदणी.
WorldFinNews

Ayushman Bharat Scheme Scam : कॅगचा धक्कादायक खुलासा..! ‘या’ योजनेत एकाच मोबाईल नंबरवरून झाली 7.5 लाख लोकांची नोंदणी.

Ayushman Bharat Scheme Scam
Ayushman Bharat Scheme Scam

Ayushman Bharat Scheme Scam : पुन्हा भारत सरकारच्या महत्वाच्या योजनेमध्ये घोटाळा झालाय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कारण भारत सरकारच्या आयुष्मान भारत या योजनेमध्ये तब्बल 9999999999 या एकाच मोबाईल नंबर वरून तब्बल 7.5 लोकांची नोंदणी झाली आहे.

अशी माहिती कॅगने लोकसभेमध्ये दिली आहे. एवढंच नाही तर कॅगने लोकसभेत सादर केलेल्या अहवालामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Ayushman Bharat Scheme Scam : कॅगच्या अहवालामध्ये अनेक मोठे खुलासे –

कॅगच्या अहवालामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 9999999999 या एकाच मोबाईल नंबर वरून तब्बल 7.5 लोकांची नोंदणी झाली आहे.

विशेष बाब म्हणजे या मोबाईल नंबरचे कोणतेही सिम कार्ड अस्तित्वात नसल्याचं या अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे.

यासोबत अनेक बनावट नंबर वरून या योजनेमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. यात 8888888888 या मोबाईल नंबरवरून तब्बल 1 लाख 39 हजार 300 लोकांनी नोंदणी केली आहे.

याशिवाय असे चुकीचे 20 क्रमांक देखील या अहवालातून समोर आले आहे. या क्रमांकावरुन जवळपास 10,000 ते 50,000 लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Ayushman Bharat Scheme Scam ; अहवालामध्ये नेमकं म्हटलं काय?

कॅगच्या अहवालामध्ये म्हटलं आहे की लाभार्थ्यांविषयी माहिती करून घेण्यासाठी त्याचा मोबाईल नंबर हा खूप महत्वाचा असतो.

प्रामुख्याने मोबाईल नंबरच्या आधारे लाभार्थ्याची ओळख पटवली जाते. जर मोबाईल नंबर खोटा किंवा बनावट असेल तर लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतो.

असं या आवाहालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 7.87 कोटी लोकांनो नोंदणी केली आहे.

त्यातील तब्बल 9 लाखांच्या आस पास नोंदी या बनावट असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नवीन उपडेटमध्ये चूक सुधारली जाऊ शकते

कॅगच्या अहवालामध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, BIS 2.0 या नव्या उपडेटमध्ये ही समस्या दूर होणार आहे.

ह्या उपडेटमध्ये एकाच मोबाईल नंबरवरुन ठराविक संख्येपेक्षा जास्त लोकांची नोंदणी करता येणार नाही.

यासोबतच कोणत्याही अवैध नंबरवरून नोंदणी करता येणार नाही.

BIS 2.0 या नव्या उपडेटमध्ये एखाद्या लाभार्थ्याला रुगालयामध्ये दाखल केल्यापासून त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर संपर्क साधण्यात यावा अशी तरतूद लाभार्थी मार्गदर्शक पुस्तिकामध्ये करण्यात आली आहे. असं देखील कॅगच्या अहवालामध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बँका असणार बंद

Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात देशातील बँकांना तब्बल 15...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Important decisions of Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन ह्यांचे लोकप्रिय निर्णय.

Important decisions of Nirmala Sitharaman : 2019 सालापासून निर्मला सीतारामन ह्या भारताच्या...