Function Of Banks : मागच्या लेखात आपण बँकांचे प्रकार कोणते असतात हे आपण वाचलं. प्रकारानुसार त्यांची कामे समजावून घेऊयात. सरसकटपणे सर्वांची काही कामे सारखी असतात. ज्यामध्ये खालील काही गोष्टी समाविष्ट आहेत.
- जनतेकडून ठेवी Fixed Deposites स्वीकारणे
- प्रत्येकाच्या खात्यात असलेली रक्कम नियमानुसार काढून देण्याची सेवा पुरवणे
- कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे
- निधीचे हस्तांतरण म्हणजे Funds Transfer करणे
- Demand Draft काढून देणे
- ग्राहकांना लॉकर सुविधा उपलब्ध करून देणे
- परकीय चलनासह व्यवहार करणे
- इ इ कामाचा समावेश होतो.
आता बँक प्रकारानुसार त्यांची प्रमुख कार्य कोणती असतात ते पाहुयात.
1) देशाची केंद्रीय वित्तीय संस्था किंवा सेंट्रल बँक ऑफ द कंट्री म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.
प्रत्येक देशाची एक मध्यवर्ती बँक (Central Bank) असते, जी त्या देशातील इतर सर्व बँकांवर नियमन करते. मुख्य कार्य म्हणजे सरकारची बँक म्हणून काम करणे आणि देशातील इतर बँकिंग संस्थांचे मार्गदर्शन व नियमन करणे. ह्याचसोबत चलन जारी करणे, आर्थिक धोरणांची अंमलबजावणी करणे, अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणे अशीही जबाबदारी केंद्रीय मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank) पार पाडावी लागते. म्हणूनच रिझर्व्ह बँकेला बँकर्स बँक (Bankers Bank) असे म्हणतात.
2) Cooperative Banks – सहकारी बँक –
या बँका राज्य सरकारच्या कायद्याअंतर्गत स्थापित केल्या जातात. कृषी क्षेत्र आणि इतर संलग्न कामांसाठी अल्पमुदतीचे कर्ज पुरवणे हे नियमित कामांशिवायचे मुख्य काम सहकारी बँकांचे असते. सहकारी बँकांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सवलतीचे कर्ज उपलब्ध करून देऊन जनकल्याणाला चालना मिळाली पाहिजे ह्यासाठी काम करणे हे असते. तीन स्तरांवर सहकारी बँक काम करतात –
स्तर 1 – राज्यपातळी स्तर – ह्या बँका राज्य सहकारी बँक म्हणून ओळखल्या जातात ज्यांना RBI कडून, राज्य सरकार कडून, नाबार्डकडून फंडिंग प्राप्त होते.
स्टार 2 – जिल्हा सहकारी बँक – ह्या बँका जिल्हापातळीवर कार्यरत असतात. निवडणुकीतून संचालक मंडळ निवडले जाते आणि बँकेचे व्यवस्थापकीय कामकाज चालते. काही गैरव्यवहार झाल्यास राज्य सरकार त्या बँकेवर प्रशासक नियुक्त करते.
स्टार 3 – प्राथमिक कृषी सहकारी बँक – ह्या बँका गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या बँक असतात.
3) Regional Rural Banks प्रादेशिक ग्रामीण बँक –
ह्या क्षेत्रातल्या बँकांचा मुख्य उद्देश कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला सवलतीचे कर्ज देणे हा असतो. 1975 साली प्रादेशिक ग्रामीण बँक ही संकल्पना अस्तित्वात आली. आजच्या घडीला भारतात 82 नोंदणीकृत प्रादेशिक ग्रामीण बँक कार्यरत आहेत. 2005 पर्यत 196 इतक्या संख्येने असलेल्या बँक आज सरकारने नियमन करून कमी केलेल्या आहेत. उदा – महाराष्ट्र ग्रामीण बँक
बाकीचे बँक प्रकार आपण पुढल्या लेखांकात पाहुयात….