Difference Between PAN, TAN, TIN : दररोजच्या जीवनात ह्यातल्या कुठ्ल्यानकुठल्या कागदाशी आपला संपर्क येत असतो. हे तिन्ही नंबर्स वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. म्हणजे तीनही नंबरचे कार्य भिन्न आहे.
PAN म्हणजे Permanent Account Number म्हणजे कायम खाते क्रमांक, TAN म्हणजे Tax Deduction and Collection Account Number म्हणजे कर वजावट आणि संकलन खाते क्रमांक आणि TIN म्हणजे Taxpayer Identification Number म्हणजे करदाता ओळख क्रमांक.
PAN, TAN आणि TIN तिन्ही दस्तऐवज महत्वाचे आहेत ज्यांची कार्ये विविध आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, कर वजा करणे किंवा गोळा करणे, व्यापार इत्यादींसह विविध कारणांसाठी सबमिट करणे आवश्यक आहे. PAN आणि TAN हे दोन्ही नंबर्स/कार्ड्स इन्कमटॅक्स खात्याकडून जरी केले जातात.तर TIN हा नम्बर त्या त्या राज्याच्या व्यावसायिक कर विभागाकडून जारी केला जातो.
PAN आणि TAN हे 10 आकडी असतात तर TIN हा 11 आकडी असतो. PAN कार्ड हे 1961 च्या इन्कमटॅक्स कायद्यातील सेक्शन 139A नुसार जारी केले जाते तर TAN इन्कमटॅक्स कायद्यानुसार सेक्शन 203A नुसार जारी केले जाते. तर TIN साठी त्या त्या राज्याचे कायदे लागू असतात.