Thursday , 31 October 2024
Home FinNews World Bank Head : पुण्याचे अजय बंगा होणार जागतिक बँकेचे अध्यक्ष? राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिला प्रस्ताव.
FinNewsWorldFinNews

World Bank Head : पुण्याचे अजय बंगा होणार जागतिक बँकेचे अध्यक्ष? राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिला प्रस्ताव.

World Bank Head : मास्टरकार्डचे (MasterCard) माजी सीईओ आणि भारतीय वंशाचे अजय बंगा (Ajay Banga) जागतिक बँकेचे प्रमुख होऊ शकतात. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेचा प्रमुख होण्याचा अजय बंगा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. व्हाईट हाऊसने गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे. डेव्हिड मालपास हे सध्या जागतिक बँकेचे अध्यक्ष (World Bank Head) आहेत. पण लवकरच ते राजीनामा देणार आहेत. जो बायडेन म्हणाले की, अजय बंगा यांनी तीन दशकांहून अधिक काळ जागतिक कंपन्यांच्या व्यवस्थापनात काम केले आहे. रोजगार निर्मिती आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जागतिक नेत्यांसोबत काम केले. त्यांच्याशी भागीदारी करण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

World Bank Head

World Bank Head कोण आहेत अजय बंगा?

63 वर्षीय अजय बंगा हे भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. सध्या ते जनरल अटलांटिक या इक्विटी कंपनीत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच अजय बंगा हे नेदरलँड्समधील एक्सॉर या इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपनीचे चेअरमन आहेत. बंग यांनी यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलचे (यूएसआयबीसी) माजी अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. ही कंपनी भारतात गुंतवणूक करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.

World Bank Head अजय बंगा यांचे जन्मस्थान पुणे :

अजय बंगा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट येथे एका शीख कुटुंबात झाला. त्याचे कुटुंब मूळचे पंजाबमधील जालंधरचे आहे.

Related Articles

Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बँका असणार बंद

Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात देशातील बँकांना तब्बल 15...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...