World Bank gave loans to India : भारता शेजारील राष्ट्र दिवाळखोरीत जाण्याच्या मार्गावर असताना जागतिक बँकेने (World Bank) भारताला मोठी मदत केली आहे. जागतिक बँकेने (World Bank) भारताला तब्बल 1 अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं आहे (World Bank gave loans to India) भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी जागतिक बँकेने भारताला हे कर्ज दिले आहे. शुक्रवारी जागतिक बँक आणि भारत सरकार यांच्यात 500 दशलक्ष डॉलर्सच्या दोन कर्जासंबंधित कागजपत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
आरोग्य सुविधांच्या बळकटी करणासाठी पैसे खर्च होणार –
जागतिक बँकेने (World Bank) मंजूर केलेला एक अब्ज डॉलर कर्जाच्या निधीचा उपयोग पंतप्रधान आयुष्मान भारत अभियानाला आणि पायाभूत आरोग्य सुविधांच्या बळकटी करणला प्रोत्साहन देण्यासाठी खर्च केला जाणार आहे. यामुळे देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
कोरोना आल्यानंतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेसह आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्या होत्या. त्यामुळे आता जगभरातील देशांकडून आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर देत आहे. तसेच भारताने कोरोनाच्या कठीण काळात इतर देशांना लसींचा आणि औषधांचा पुरवठा केला.आता आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम प्रगत बनवण्यासाठी भारताने जागतिक बँकेकडून कर्ज घेतलं आहे.