What is Fiscal Deficit? : नुकताच अर्थसंकल्प सादर झाला. त्यावर अनेक पोस्ट, बातम्या, चांगलं वाईट असं बरच काही आपण वाचलं असेल. त्यात वित्तीय तूट हा शब्द आपण नक्कीच ऐकलं असेल.
What is Fiscal Deficit? वित्तीय तूट म्हणजे काय?
वित्तीय तूट म्हणजे एका आर्थिक वर्षात सरकारचा एकूण खर्च आणि एकूण महसूल संकलन (कर्ज वगळून) ह्यामधला फरक. दुस-या शब्दात, ही अशी रक्कम आहे ज्याद्वारे सरकारचा खर्च कर आणि इतर स्त्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. म्हणजे थोडक्यात काय तर अंगापेक्षा बॉंगा मोठा.
हेही वाचा : Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु.
सरकारने घेतलेल्या कर्जात विकासासाठी, तसेच इतर काही महत्वाच्या योजनांसाठी वाढ होत असते. मोठी वित्तीय तूट देशाच्या राजकोषीय आरोग्याबद्दल चिंता निर्माण करू शकते आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक प्रभाव पडतो.
ह्याचाच परिणाम म्हणून महागाई वाढत जाते आणि व्याजदर वाढत जातात. सरकारच्या वित्तीय तूट (Fiscal Deficit) कमी करण्याच्या हालचाली सातत्याने होत असतात. त्यामुळे, महसूल वाढवणे, खर्च कमी करणे आणि त्यांच्या राजकोषीय धोरणांची कार्यक्षमता सुधारणे यासारख्या उपायांद्वारे राजकोषीय तूट नियंत्रणात ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असते.