What is Fintech? : फिनटेक म्हणजे काय? आजकाल अनेक माध्यमात हा शब्द वाचायला मिळतो.
Fintech हा “(Finance) आर्थिक” आणि “(Technology) तंत्रज्ञान” ह्या दोन गोष्टींचे मिश्रण आहे. इंटरनेट, मोबाईल, मोबाईल एप्स च्या माध्यमातून आर्थिक यंत्रणा कार्यान्वित करणारी जग बदलणारी गोष्टी म्हणजे Fintech. ह्यात क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या पैसे कर्जाऊ देणे, पैसे भरणे/बिल पेमेंट करणे, ब्लॉकचेन, वेल्थ मॅनेजमेंट ह्या चार उपप्रकारात काम करतात. जागतिक पातळीवर भारत देशाचा फिनटेक सुरु होण्याचा दर सर्वाधिक आहे. डिजिटायझेशन आणि 4G आणि आता 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटी असताना देशात उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.
Fintech क्षेत्रात भारत देशाने प्रत्येक महासत्तेला मागे टाकले आहे. Fintech आज भारतातील आर्थिक व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग बनल्या आहेत. देशाच्या वाढीस निरंतर हातभार लावून अर्थव्यवस्था अद्ययावत ठेवण्यात आघाडीवर असणारे हे क्षेत्र आहे. फिनटेकचा मोठ्या प्रमाणात उपयोग कंपन्या, बिझनेसेस आणि ग्राहकांना त्यांचे फायनान्स ऑपरेशन्स मॅनेज करण्यात होतो. संगणक, वेबसाईट, मोबाईल एप्स च्या माध्यमातून काम करून व्यवहार पूर्ण करण्यात येत असल्याने वेळेची बचत होते.
मोबाईल बँकिंग, क्रिपो करन्सी, इंशुरन्स, ब्लॉकचेन, बजेट मॅनेजमेंट ह्या प्रकारात जास्त काम होत असल्याने फिनटेक कम्पन्या तेजीत असल्याचे दिसते. भारतीय बाजारपेठेची फायनान्शिअल इकोसिस्टीम म्हणजे आर्थिक यंत्रणेचा महत्वाचा भाग असल्याचे सिद्ध झाले आहे. भविष्य हे कायम वेगवान असते. तसेच पूर्वी एखादी गोष्ट बँकेतून मिळवण्यासाठी लागणार वेळ आणि आता लागणार वेळ ह्यातला फरक आपण जाणून आहोतच.
काम सोपे झाले असले तरी आपल्या एखाद्या चुकीने बोजा वाढणार नाही ना ह्याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे. सजग रहा सतर्क रहा.