Thursday , 21 November 2024
Home FinGnyan Financial Goals : आर्थिक उद्दीष्ट्ये साध्य करणे म्हणजे काय?
FinGnyan

Financial Goals : आर्थिक उद्दीष्ट्ये साध्य करणे म्हणजे काय?

Financial Goals : फायनान्शिअल गोल्स म्हणजे आर्थिक उद्दिष्ट. म्हणजे तुम्ही कमावत असलेल्या आणि भविष्यात कमावू इच्छिणाऱ्या पैशासाठी आखलेली कोणतीही योजना. फायनान्शिअल गोल्स उद्देश आणि ऊर्जा प्रदान करतात तसेच गुंतवणूकीसाठी शिस्तबद्ध राहण्यास मदत करतात. असं म्हणतात की A wise person should have money in their head, but not in their heart. डोक्यात विचार पैश्याचा हवा. कमावलेले नियमित पातळीवर वाढावेत आणि पुनर्गुंतवणूक करून त्यांची साखळी तयार व्हावी.

Financial Goals

फायनान्शिअल गोल्स तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे ठरवण्यासाठी उपयुक्त असतात. आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या आर्थिक भविष्याचे नियोजन करू शकता. कुठे गुंतवणूक करावी, किती गुंतवणूक करावी, किती काळासाठी करावी आणि तुमच्या आर्थिक अपेक्षा योग्यरित्या सेट करणे म्हणजे फायनान्शिअल गोल्स सेट करणे.

सुयोग्य पद्धतीने मार्गदर्शन घेऊन ठरवलेली स्मार्ट आर्थिक उद्दिष्टे तुम्हाला उत्तम अंमलबजावणीद्वारे भविष्य सुनिश्चित करण्यास मदत करतात. आर्थिक ध्येय आपल्या मनात स्पष्ट असायला पाहिजे. ज्या आर्थिक उद्दिष्टांशी भावनिक संबंध आहे आणि अशी उद्दिष्टे साध्य होण्याची अधिक शक्यता असते. एक स्पष्ट आकडा डोक्यानं ठेवून नियोजन झाले असल्यास GOAL पर्यंत पोहोचणे आधीच सुलभ होते. आपल्या नियोजनात खर्च आणि भविष्यातली कमावण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन करावे.

उदाहरणार्थ 5 वर्षात 15 लाख रुपये साठवायचे असल्यास सध्याच्या होत असलेल्या कमाईतून सर्व खर्च वजा जाता महिन्याला किमान 25000 रुपये बाजूला टाकणे म्हणजे विशिष्ट ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक ठरेल. तरच 5 वर्षांनी किमान १५लाख रुपयांचा निधी जमा होऊ शकेल.

उद्धिष्ट ठरवताना रियलिस्टिक म्हणजेच सध्या होऊ शकेल असेच ध्येय ठरवणे योग्य. अंथरून पाहून पाय पसरावे असे म्हंटले जाते त्यानुसार भविष्याकडे नजर असताना आज म्हणजे वर्तमानातली आर्थिक परिस्थिती विसरून चालत नाही. फायनान्शिअल गोल्ससाठी SMART उद्दिष्टे ठरवावीत

SMART म्हणजे –

  • Specific – विशिष्ट
  • Measurable – मापन करण्यायोग्य
  • Achievable – साध्य होण्यासारखे
  • Realistic – शक्य असलेले
  • Time – काळसुसंगत

आपल्या भविष्यातील गरज आणि आवश्यकता ह्याचा अंदाज आला तर बचत आणि गुंतवणुक अधिक स्पष्टतेने केली जाऊ शकते. योग्य गुंतवणूक करणारा मार्गदर्शक शोधणे आणि आपले गुंतवणुकीसंदर्भातील ज्ञान, माहिती नियमित अद्ययावत ठेवणे हा फायनान्शिअल गोल्स यशस्वी होण्याकरीतासर्वात योग्य पर्याय आहे.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...