Will Indian rupee overtake the dollar? : संपूर्ण जगभरात मंदीचं सावट आहे. काही देशांची अर्थव्यवस्था पार कोलमडून गेली आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक या मंदीला बळी पडली आहे. तसेच अमेरिका व युरोपातील बँक बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तसेच जगभरातील महागाईने देखील उच्चांक गाठला आहे. या सर्वांचा परिणाम भारताच्या रुपयावर होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरत चालली आहे आणि डॉलर आणखी मजबूत होत आहे. ह्यामुळे भारतात आयात होणाऱ्या इंधन आणि इतर गोष्टींवर मोठ्या प्रमाणात डॉलर्स आणि विदेशी चलन खर्च होत आहे त्यामुळे विदेशी चलनाचा साठा कमी होत आहे. आता समतोल राखण्यासाठी भारत सरकार आणि आरबीआय यांनी महत्वाचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारच्या पुढाकाराने अनेक देशांनी त्यांच्या देशात व्यापार करण्यासाठी भारतीय रुपयाला मान्यता दिली आहे.
भारतीय रुपयाचे ‘जागतिक चलन’ बनण्याच्या दिशेने पाऊल..
भारतीय रुपया डॉलरची जागा घेऊ शकतो, कारण सुरुवातीलाच जगभरातील तब्बल आठरा देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी आणि ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी भारतीय रुपयामध्ये म्हणजेच INR’मध्ये (Indian rupee) व्यापार करण्यास सहमती दर्शवली आहे. भारताची मध्यवर्ती बँक आरबीआयने रशिया आणि श्रीलंकेसह 18 देशांमध्ये 60 विशेष रुपी व्होस्ट्रो अकाउंट उघडण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतीय रुपयाने ‘जागतिक चलन’ बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे, असं म्हणण्यास काही हरकत नाही.
भारतीय रुपयांमध्ये ‘या’ 18 देशांनी व्यापार करण्याची परवानगी दिली आहे :
1 – रशिया.
2 – सिंगापूर.
3 – श्रीलंका.
4 – बोत्सवाना.
5 – फिजी.
6 – जर्मनी.
7 – गयाना.
8 – इस्त्राईल.
9 – केनिया.
10 – मलेशिया.
11 – मॉरिशस.
12 – म्यानमार.
13 – न्यूझीलंड.
14 – ओमान.
15 – सेशेल्स.
16 – टांझानिया.
17 – युगांडा.
18 – युनायटेड किंगडम.
भारताचे वित्त राज्यमंत्री भगवत कराड यांनी संसदेला माहिती दिली की, भारतीय रुपयात पेमेंट सेटलमेंटसाठी 18 देशांतील बँकांचे SRVA उघडण्यासाठी 60 प्रकरणांमध्ये देशी आणि विदेशी AD (Authorised Dealer) बँकांना मंजुरी दिली आहे.