Chartered Accountant : सनदी लेखापाल म्हणजे CA. चार्टर्ड अकाउंटंट हे Taxation (कर आकारणी), Audit (लेखापरीक्षण) आणि Financial Management आर्थिक व्यवस्थापन ह्या गोष्टींचा समावेश असलेल्या बिझनेस रिलेटेड फिनान्शिअल गोष्टी हाताळतात. ते म्हणतात ना, Behind every successful Business there is a Chartered Accountant.
दरवर्षी CAची फायनल परीक्षा देणाऱ्यांपैकी जास्तीत जास्त 3 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. CA होण्यासाठी तीन परीक्षा असतात. CA Foundation+CA Intermediate+3years articleship+CA Final ह्या तीन टप्प्यातून जी मंडळी पार होतात ती CA म्हणून पुढे काम करतात. अंदाजे 70 हजार विद्यार्थी ह्यातलया परीक्षांना दरवर्षी बसतात आणि पण पासिंग चे प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. असं का होत असेल? CA होणे खरंचइतके अवघड आहे का?
अभ्यासाचे नियोजन केल्यास तर नक्कीच नाही. पण तरीही अनेक जण प्रयत्न मध्येच सोडून देतात. ह्या अभ्यासात दमवणारे, थकवणारे शेड्युल तयार होते. तरीही हार मानून चालत नाही. CA कोर्स कठीण असण्याची कारणे म्हणजे त्याचा विस्तृत असा अभ्यासक्रम, शिकायला असलेल्या प्रत्येक विषयाचे आवश्यक असे सखोल ज्ञान, कोर्सचा पूर्ण कालावधी तसेच कोर्स होईस्तोवर अनेक अश्या गोष्टी असतात ज्याला तोंड द्यावे लागते. खरा कस लागतो तो आर्टिकलशिप मध्ये. त्याच काळात अनेकजण माघारी फिरतात. ह्या काळात जर धीर धरून रेटून रोज अभ्यास केला तर फायनल सुटणे अवघड अजिबात नाही. ज्ञान, स्मरणशक्ती, कष्ट ह्या तीन गोष्टीच एखादाला चार्टर्ड अकाउंटंट बनवतात. ह्या तीन गोष्टींच्या जीवावर प्रत्येक टप्पा यशस्वी पूर्ण करता येतो.
सतत प्रयत्न करून अपयश येते, कामाचा ताण इतका असतो की अभ्यासाला वेळच मिळत नाही अशी कारणे अनेक विद्यार्थी देतात. ह्यावर उपाय म्हणजे आर्टिकलशिप काळात रोज नियमित अभ्यास करीत राहायला हवा. असं म्हणतात की CA is not tough course, it is a course for Tough people.